Empowering Youth Startups

Inspired by Mr. Devendra Fadnavis, we offer free startup training to young entrepreneurs across Maharashtra.

भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून उदयास आला आहे आणि एक विकसित राष्ट्र बनण्यासाठी सज्ज होत आहे. भारतामध्ये सध्या 1.25 लाखांहून अधिक स्टार्टअप आणि 110 युनिकॉर्न स्टार्टअप आहेत ज्यांची वॅल्यूएशन रु 8,000 कोटी पेक्ष्या जास्त आहे.स्टार्टअपच्या माध्यमातून युवा पिढीच्या विचारात परिवर्तन घडत आहे; नोकरी शोधणारे बनण्याऐवजी आता युवक नोकरी देणारा बनण्यास उत्सुक आहेत.

आपल्या राज्यातसुद्धा स्टार्टअप इकोसिस्टम केवळ मेट्रो शहरांपुरती मर्यादित नाही, ती आता सामाजिक संस्कृती बनत आहे. आपल्याला जर महाराष्ट्राची इकॉनोमी एक ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त करायची असेल तर सर्वात मुख्य सहभाग राहणार आहे तो म्हणजे स्टार्टअपकडून आणि त्याकरिता गरज आहे ती योग्य प्रशिक्षण आणि लागणाऱ्या पायाभूत सुविधांची.

स्टार्टअप ची समीकरणे ही पारंपारिक व्यवसायापेक्षा वेगळी आहेत. मात्र अनेक वेळा यातला फरकच लक्षात न आल्याने सुरवातीच्या टप्प्यात स्टार्टअप सुरु करणाऱ्या नव-उद्योजकांकडून अनेक चूका होत असतात. महाराष्ट्रातील छोट्या शहरातील होतकरू नव उदयोजकांना स्टार्टअप संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु असलेल्या विविध योजनांचे फायदे मराठी उद्योजकांपर्यंत पोहचत नाहीत.

या ट्रेनिंग द्वारे स्टार्टअप म्हणजे काय, स्टार्टअपची योग्य सुरुवात कशी करावी, आपली बिझनेस आयडिया प्रत्यक्षात कार्यरत कशी करावी, मिनिमम व्हायेबल प्रॉडक्ट कसे बनवावे, सुरुवातीच्या टप्प्यात कोणत्या चुका टाळाव्यात, ग्राहकांपर्यंत कसे पोहचावे, स्टार्टअपला निधी अर्थात फंडिंग का मिळते, फंडींग मिळविणारे स्टार्टअप्स नेमकी कोणती स्ट्रेटजी वापरतात, फंडिंग मिळविण्यासाठी स्वतःला आणि आपल्या स्टार्टअपला तयार कसे करायचे? अशा विविध अधिक महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

स्टार्टअप्ससाठी आमचा सपोर्ट :

  • स्टार्टउप शिक्षण आणि कौशल्य वाढवणे – विद्यार्थ्यांसाठी खास प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊन त्यांना उद्योजक बनण्यासाठी मदत करणे.

  • इनक्युबेशन आणि मार्गदर्शन – IIT, T-Hub सारख्या प्रमुख सेंटर वर निवडक स्टार्टअप्सकरिता मार्गदर्शन आणि नेटवर्किंगच्या संधी देणे.

  • निधी आणि आर्थिक मदत – स्टार्टअप्ससाठी शासकीय योजनाची माहिती आणि पात्र होण्यासाठी मार्गदर्शन.

  • स्टार्टअप इव्हेंट्स आणि स्पर्धा – महाराष्ट्र स्टार्टअप वीक आणि स्टार्टअप यात्रा यांसारख्या इव्हेंट्सद्वारे आपल्या आयडिया आणि प्रकल्पांना गुंतवणूक मिळवण्याची संधी.

  • कायदेशीर मदत – स्टार्टअप इंडिया पोर्टलवर सहज नोंदणी करून सवलत मिळवणे.

Snapshots from our inspiring startup training events

Youth Rise

Empowering young dreams with practical startup training.

A group of enthusiastic young people collaborating in a bright workshop room.
A group of enthusiastic young people collaborating in a bright workshop room.
Skill Building

Hands-on sessions designed to hone entrepreneurial skills and boost confidence, inspired by Mr. Fadnavis’s vision.

Community Growth

Connecting local youth to mentors and resources, fostering a strong network of future entrepreneurs.